Saturday, January 29, 2011

लोकांसाठीच्या ज्या अडचणी येतात त्या संदर्भात ई-गव्हर्नन्स् तर्फे काही उपाययोजना करण्यात येतील का ?

युवकांना रोजगाराचा प्रश्न मोठा असतो. सुशिक्षित बेरोजगार युवक त्याला नोकरी शोधण्यासाठी कुठे जागा उपलब्ध आहेत, ही माहिती इंटरनेटद्वारे मिळेल. स्वयंरोजगार विभागाची एक खास योजना आहे. महा-ई-सेवा केंद्रात जाऊन त्याला नोकरीसाठी रजिस्टर करुन घेता येईल. आज त्याला एम्पॉमेंट ऐक्सचेंज मध्ये जावे लागते आता तेथे न जाता महा -ई केंद्रात जाऊन एम्पलॉयमेंट कार्ड रजिस्टर करुन घेता येईल. तसेच महा- ई-सेवामध्ये नोकरीसाठी अर्ज करता येतील. नोकरीसाठी अर्ज करताना जातीचे प्रमाणपत्र, वेतन प्रमाणपत्र या सर्व गोष्टींसाठी त्याला ऑफिसमध्ये चक्कर मारावी लागते. त्यांना चक्कर मारण्याची गरज भासू नये म्हणून ई-सेवा केंद्रामार्फत सर्व प्रमाणपत्र देण्यात येतील.

No comments: