Saturday, January 29, 2011

प्रश्न: ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी सर्व सामान्य माणसांसाठी काय उपाय योजना केली आहे? लोकसुविधा केंद्र आहेत. माहिती व तंत्रज्ञानद्वारे झालेले कार्य यांची कार्यपध्दती सोपी सुलभ आहे का?

उत्तर: महाराष्ट्रात ३५ हजार गावे आहेत. शासनामार्फत प्रत्येक ३ गांवाच्या मागे एक ई -सेवा म्हणजे संपूर्ण गावांमध्ये ११,८०० महा -ई-सेवा केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. त्या महा -ई-सेवां केंद्रामध्ये गेल्यानंतर तो कर्मचारी काम्युटर जाणनारा असेल तो सरकारी नसून गावातील एक व्यक्ति असेल तो ते केंद्र चालवेल. त्याला हायस्पिड इंटरनेट कनेक्शन उपलब्ध करुन देऊ. त्या नंतर जे वेगवेगळे विभाग त्यांची जी योजना आहे. त्याची माहिती व योजनांचे फॉर्मस् केंद्राच्या कॉम्युटरवर उपलब्ध करुन देण्यात येतील. कामासाठी वेगवेगळया विभागात न जाता त्यांना त्याच विभागात फॉर्म मिळेल. त्याच ठिकाणी फॉर्म पावती मिळेल. नंतर त्यांना नंबर देण्यात येईल. त्यांचा नंबर त्यांना केंद्रावर येऊन प्रकरण कुठपर्यंत गेले आहे. त्यांना दाखला कधी मिळेल याची माहिती मिळेल. ज्यांच्याकडे कॉम्युटर नाही त्यांना महा-ई-सेवे मार्फत माहिती मिळेल. महा-ई-सेवा टप्प्या टप्प्याने सुरु करीत आहेत.

No comments: