Thursday, October 27, 2011

महा ई सेवा केंद्राआतर्गत कोणते उपक्रम राबविण्यात येणार आहेत?

विविध दाखले देण्याकरीता शिबिरे आयोजित करणे.
विविध दाखल्यांकरिता आवश्यक असलेले अर्ज ऑनलाईन उपलब्ध करुन देणे व आवश्यक त्या कागदपत्राची पुर्तता करुन सदर अर्ज ऑनलाईन सादर करण्याची पर्यायी सुविधा सेतू केंद्र व ई-सेवा केंद्रामार्फत सुरु करणे.
गांव, नकाशा प्रमाणे अतिक्रमीत व बंद झालेले पाणंद / पांधण/ पानधन/ शेतरस्ते / शिवरस्ते / शिवाररस्ते मोकळे करणे.
एक महिन्याचेवर प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढणे. त्याकरिता मंडळ मुख्यालयी फेरफार अदालत घेणे.
माहिती मिळण्यासाठी व तक्रार निवारणासाठी ई-लोकशाही प्रणाली (Help line) उपलब्ध करुन देणे.
नागरिकांना एका छत्राखाली सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी समाधान योजना राबविणे
ई-चावडी योजना प्रलंबित विविध मुळ अधिकारीतेमधील महसूल प्रकरणे व अपिल प्रकरणे १ वर्षाच्या आत निकाली काढणे.
विविध शासकीय कामांसाठी मोबाईल, इंटरनेट, व्हीडीओ कॉन्फरन्स, जीपीएस., सॅटेलाईट ईमेजचा मोठ्या प्रमाणात वापर करणे.
नागरिकांच्या सोईकरिता प्रत्येक जिल्हाधिकारी व तहसिल कार्यालयात सुविधा कक्ष (facilitatiocentre) सुरु करणे.

अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती नोंदविण्यासाठी विभागीय आयुक्त / जिल्हाधिकारी / उपविभागीय अधिकारी व तहसिल कार्यालयात बायोमेट्रीक यंत्रे बसविणे.

१० सुत्री मोहिम अंतर्गत महाविद्यालय/शाळा मधील विद्यार्थी यांना विविध प्रकारचे प्रमाणपत्र महा ई सेवाकेंद्रातुन मिळणार

शेतकरी, शेतमजूर, महिला आणि सामान्य नागरिक यांना विविध प्रश्नांच्या संदर्भात तलाठी कार्यालय, तहसिल कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय व विभागीय आयुक्त कार्यालय येथे वारंवार जावे लागते. पण त्याचबरोबर दरवर्षी जून- जुलै महिन्यात दहावी व बारावी झाल्यानंतर शाळा, कॉलेज प्रवेशाच्या वेळेस विविध दाखल्यांसाठी तहसिलदार कार्यालयात विद्यार्थ्यांची व नागरिकांची प्रचंड गर्दी होत असते. शासनाच्या नव नवीन योजना, नियम व अटीमुळे नोकरीसाठी वेगवेगळया दाखल्यांची गरज भासते. यासाठी बदलत्या काळातील आव्हानावर मात करण्यासाठी उपलब्ध साधन सामुग्री व आधुनिक तंत्रज्ञानाचा सुनियोजित वापर तसेच जनतेच्या गरजा व निकड लक्षात घेऊन राज्यात सुवर्ण जयंती राजस्व अभियान राज्यातील सर्व जिल्ह्यात दिनांक १ मे २०११ पासून राबविण्यात येत आहे.