Showing posts with label ईश्वर माहोर. Show all posts
Showing posts with label ईश्वर माहोर. Show all posts

Wednesday, November 16, 2011

बोरगांव बाजार ग्रामपंचायत मध्ये आपले स्वागत आहे .

 ग्रामपंचायतींसाठी मराठीतील परिपूर्ण संगणक प्रणाली आधुनीक तंत्रज्ञान वापरून महाग्राम डॉट कॉम या कंपनीने ग्रामसेवक ही मराठी संगणक प्रणाली तयार केली आहे.कंपनीचे 4000 पेक्षा जास्त समाधानी ग्राहक संपूर्ण महाराष्ट्रात आहेत, त्याच बरोबर प्रशिक्षण केंद्रेही कार्यरत आहेत. कंपनीकडे तज्ञ व अनुभवी सॉफ्टवेअर इंजीनीअर्स आणि स्टाफ उपलब्ध आहे. उत्कृष्ट दर्जाचे प्रशिक्षण, स्टॅन्डर्ड क्वालिटी प्रॉडक्ट आणि ग्राहकहित हेच कंपनीचे उद्दीष्ट आहे. gramsavak grampanchayat software
संगणक क्षेत्रात झपाट्याने होणारी क्रांती व सर्व क्षेत्रातील होणारा वाढता वापर लक्षात घेता ग्रामपंचायतींनी संगणकीकरणासाठी अंगीकारलेली मानसीकता कौतुकास्पद आहे.याच कारणास्तव ग्रामपंचायतींच्या गरजा व अडचणी विचारात घेऊन महाग्राम डॉट कॉम ने हे सॉफ्टवेअर विकसित केले आहे.

महाग्राम डॉट कॉम या कंपनीचे मुख्य कार्यालय अहमदनगर व शाखा कार्यालय औरंगाबाद येथे असून कंपनीद्वारे ग्रामपंचायतींना उत्कृष्ट सेवा व प्रशिक्षण पुरविले जातेबोरगांव बाजार ग्रामपंचायत

Thursday, October 27, 2011

महा ई सेवा केंद्राआतर्गत कोणते उपक्रम राबविण्यात येणार आहेत?

विविध दाखले देण्याकरीता शिबिरे आयोजित करणे.
विविध दाखल्यांकरिता आवश्यक असलेले अर्ज ऑनलाईन उपलब्ध करुन देणे व आवश्यक त्या कागदपत्राची पुर्तता करुन सदर अर्ज ऑनलाईन सादर करण्याची पर्यायी सुविधा सेतू केंद्र व ई-सेवा केंद्रामार्फत सुरु करणे.
गांव, नकाशा प्रमाणे अतिक्रमीत व बंद झालेले पाणंद / पांधण/ पानधन/ शेतरस्ते / शिवरस्ते / शिवाररस्ते मोकळे करणे.
एक महिन्याचेवर प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढणे. त्याकरिता मंडळ मुख्यालयी फेरफार अदालत घेणे.
माहिती मिळण्यासाठी व तक्रार निवारणासाठी ई-लोकशाही प्रणाली (Help line) उपलब्ध करुन देणे.
नागरिकांना एका छत्राखाली सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी समाधान योजना राबविणे
ई-चावडी योजना प्रलंबित विविध मुळ अधिकारीतेमधील महसूल प्रकरणे व अपिल प्रकरणे १ वर्षाच्या आत निकाली काढणे.
विविध शासकीय कामांसाठी मोबाईल, इंटरनेट, व्हीडीओ कॉन्फरन्स, जीपीएस., सॅटेलाईट ईमेजचा मोठ्या प्रमाणात वापर करणे.
नागरिकांच्या सोईकरिता प्रत्येक जिल्हाधिकारी व तहसिल कार्यालयात सुविधा कक्ष (facilitatiocentre) सुरु करणे.

अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती नोंदविण्यासाठी विभागीय आयुक्त / जिल्हाधिकारी / उपविभागीय अधिकारी व तहसिल कार्यालयात बायोमेट्रीक यंत्रे बसविणे.

१० सुत्री मोहिम अंतर्गत महाविद्यालय/शाळा मधील विद्यार्थी यांना विविध प्रकारचे प्रमाणपत्र महा ई सेवाकेंद्रातुन मिळणार

शेतकरी, शेतमजूर, महिला आणि सामान्य नागरिक यांना विविध प्रश्नांच्या संदर्भात तलाठी कार्यालय, तहसिल कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय व विभागीय आयुक्त कार्यालय येथे वारंवार जावे लागते. पण त्याचबरोबर दरवर्षी जून- जुलै महिन्यात दहावी व बारावी झाल्यानंतर शाळा, कॉलेज प्रवेशाच्या वेळेस विविध दाखल्यांसाठी तहसिलदार कार्यालयात विद्यार्थ्यांची व नागरिकांची प्रचंड गर्दी होत असते. शासनाच्या नव नवीन योजना, नियम व अटीमुळे नोकरीसाठी वेगवेगळया दाखल्यांची गरज भासते. यासाठी बदलत्या काळातील आव्हानावर मात करण्यासाठी उपलब्ध साधन सामुग्री व आधुनिक तंत्रज्ञानाचा सुनियोजित वापर तसेच जनतेच्या गरजा व निकड लक्षात घेऊन राज्यात सुवर्ण जयंती राजस्व अभियान राज्यातील सर्व जिल्ह्यात दिनांक १ मे २०११ पासून राबविण्यात येत आहे. 

Saturday, January 29, 2011

महा ई-सेवाच्या माध्यमातून जनजागृती

शासन व जनता यांच्यातील अंतर कमी करुन शासकीय सेवा सामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम ई-गव्हर्नन्स करीत आहे. शासन निर्णय, प्रमाणपत्रे गावातच उपलब्ध व्हावीत याकरीता महा-ई सेवा केंद्राची उभारणी करण्यास त्यांनी प्राधान्य दिले आहे. विविध विकास कामांसाठी तसेच साहित्यांच्या खरेदीसाठीची प्रक्रिया पारर्दशक करण्यासाठी ऑन लाईन टेंडरींग म्हणजे ई-टेंडरींगचा लाभ उपलब्ध करुन देण्यात आला आहे असे माहिती व तंत्रज्ञान विभाग प्रधान सचिव डॉ. अजय भूषण पांडे यांनी जयमहाराष्ट्र या कार्यक्रमात सांगितले.

दूरदर्शनच्या सहयाद्री वाहिनीवरून दर मंगळवार व गुरूवार रात्री ८ ते ९ या वेळेत जयमहाराष्ट्र हा कार्यक्रम प्रसारीत करण्यात येतो. पत्रकार संजय जोग यांनी ही मुलाखत घेतली.

महा ई-सेवा या योजनेतंर्गत तात्काळ सर्टिफिकेटस पुरविण्याची सुविधा ई-गव्हर्नन्स्मुळे उपलब्ध होईल का ?

या यंत्रणेमध्ये ऑन लाईन आज अर्ज केला तर मला टोकन नंबर मिळाला तर इंटरनेटवर जाऊन हे मला पाहता येईल की माझा अर्ज आता कुठे आहे? कोणत्या कारणाने तो प्रलंबित आहे ? माझ्या नंतर कोणी अर्ज केला आहे ? आज जी सिस्टीम आहे त्यात ही माहिती मिळत नाही. एक अधिकारी तीन चार दिवसात दाखला देतो म्हणजे अशा प्रकारच्या अधिकार्‍याची माहिती संपूर्ण राज्यभर कॉम्युटर स्क्रिंनवरुन प्रसारीत होईल. मग त्या अधिकार्‍याच्या अडचणी काय आहेत त्याचा खोलपर्यंत जाऊन तो प्रश्न सोडविता येईल. अधिकार्‍यातील कमीपणा त्यांच्या लक्षात आणून देऊन अशी दिरंगाई टाळता येईल व त्यांना समज देऊन त्यांच्याकडून काम करुन घेता येईल.

लोकांसाठीच्या ज्या अडचणी येतात त्या संदर्भात ई-गव्हर्नन्स् तर्फे काही उपाययोजना करण्यात येतील का ?

युवकांना रोजगाराचा प्रश्न मोठा असतो. सुशिक्षित बेरोजगार युवक त्याला नोकरी शोधण्यासाठी कुठे जागा उपलब्ध आहेत, ही माहिती इंटरनेटद्वारे मिळेल. स्वयंरोजगार विभागाची एक खास योजना आहे. महा-ई-सेवा केंद्रात जाऊन त्याला नोकरीसाठी रजिस्टर करुन घेता येईल. आज त्याला एम्पॉमेंट ऐक्सचेंज मध्ये जावे लागते आता तेथे न जाता महा -ई केंद्रात जाऊन एम्पलॉयमेंट कार्ड रजिस्टर करुन घेता येईल. तसेच महा- ई-सेवामध्ये नोकरीसाठी अर्ज करता येतील. नोकरीसाठी अर्ज करताना जातीचे प्रमाणपत्र, वेतन प्रमाणपत्र या सर्व गोष्टींसाठी त्याला ऑफिसमध्ये चक्कर मारावी लागते. त्यांना चक्कर मारण्याची गरज भासू नये म्हणून ई-सेवा केंद्रामार्फत सर्व प्रमाणपत्र देण्यात येतील.

ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून जनजागृती

शासन व जनता यांच्यातील अंतर कमी करुन शासकीय सेवा सामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम ई-गव्हर्नन्स करीत आहे. शासन निर्णय, प्रमाणपत्रे गावातच उपलब्ध व्हावीत याकरीता महा-ई सेवा केंद्राची उभारणी करण्यास त्यांनी प्राधान्य दिले आहे. विविध विकास कामांसाठी तसेच साहित्यांच्या खरेदीसाठीची प्रक्रिया पारर्दशक करण्यासाठी ऑन लाईन टेंडरींग म्हणजे ई-टेंडरींगचा लाभ उपलब्ध करुन देण्यात आला आहे असे माहिती व तंत्रज्ञान विभाग प्रधान सचिव डॉ. अजय भूषण पांडे यांनी जयमहाराष्ट्र या कार्यक्रमात सांगितले.

दूरदर्शनच्या सहयाद्री वाहिनीवरून दर मंगळवार व गुरूवार रात्री ८ ते ९ या वेळेत जयमहाराष्ट्र हा कार्यक्रम प्रसारीत करण्यात येतो. पत्रकार संजय जोग यांनी ही मुलाखत घेतली.

Thursday, January 27, 2011

महा ई- सेवा केंद्र बोरगाव बाजार

http://wwwborgaonbaza-mahaesevakendra.blogspot.com/

महा ई सेवा केद्रं म्हणजेच ज्या ठिकाणाहुन गावातील लोकांना तालुका स्तरावरील सुविधा गावात मिळ्ण्या केंद्र स्थापन्यासाठी केद्रंसरकारणे केलेली एक योजना ज्या मधे सर्व पारदर्शक व्यवहार केल्या जाईल जो सर्व आन लाईन असल्याने सुरक्षीत राहील.व गावातील एक सुशीक्षीत बे रोजगाराला उद्योग मिळेल.